नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग च्या पुस्तकांमध्ये लवकरच बदल दिसणार आहे.खरे तर, एनसीईआरटीने स्थापन केलेल्या समितीने पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ बदलून ‘भारत’ करण्याची शिफारस केली होती. आता एनसीईआरटीच्या पॅनलने सर्व एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया हे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे.
त्यासोबतच प्राचीन इतिहास (Asian History) या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास (Classic History) हा शब्द वापरण्यात येणार आहे. आता एनसीईआरटी च्या या निर्णयानंतर भारतातील इतर बोर्ड देखील हा निर्णय घेतील का? हे आता पहावे लागणार आहे.
काहीच दिवसांपूर्वी जी २० परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी देशाचे नाव घेताना ‘इंडिया’ शब्दाचा वापर साफ टाळून ‘भारत’ हेच नाव वारंवार आवर्जून वापरले होते. . त्यावरून केंद्र सरकार आता सगळीकडेच इंडिया हे नाव न वापरता इंग्रजीत लिहितानाही भारतच लिहिले जावे ह्या भूमिकेत दिसले होते.