आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज दुपारी 4 वाजता ही सुनावणी होणार आहे. गेल्यावेळी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी झाली होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी ३६ याचिकांना ६ गटात एकत्र करुन सुनावणी घेण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे या याचिकांबाबत अध्यक्ष आज काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दोन्ही गटांच्या याचिका एकत्र करणार आहे. म्हणजे या याचिका क्लब केल्या जाणार आहेत. हा एक महत्त्वाचा निर्णय आज होणार आहे.त्यानंतर अध्यक्ष आज नवीन टाईम टेबल जाहीर करण्याचा मोठा निर्णयही घेणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना तसे निर्देश दिले होते. त्यानुसार हे दोन महत्त्वाचे निर्णय होतील.