अंबाबाईच्या करवीर नगरीत म्हणजेच कोल्हापूर येथे अष्टमी च्या शुभदिनी रविवार दि 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्र सेविका समितीचे सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न झाले.
कोल्हापूरच्या खराडे महाविद्यालयातून या संचलनास प्रारंभ झाला. करवीरपूर च्या रंकाळा तलावा जवळील कमान, साकोला कॉर्नर, महाकाली मंदिर रस्ता ,संध्या मठ इ भागातून राष्ट्र सेविका समितीच्या मातृशक्तीचा आविष्कार दाखवत पुन्हा खराडे महाविद्यालयात संचलनाचा समारोप झाला
या संचलनात एकूण 116 सेविका अभिमानाने संपूर्ण गणवेशात सहभागी झाल्या होत्या. 19 सेविका घोष गणात घोष वाजवित होत्या ज्यात आई व 2 लेकी या 2 पिढ्या एकत्र वादन करीत होत्या. या घोष गणात 60 वर्षाच्या मावशी (खरेतर तरुणीच म्हणायला हवे) ही उत्साहाने वंशी गणात वंशी वाजवित होत्या.
याप्रसंगी राष्ट्र सेविका समितीच्या विभाग संपर्क प्रमुख मा. मेघा ताई जोशी आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती. माजी महापौर सौ. सई खराडे यांच्या हस्ते सुरवातीला शस्त्र पूजन करण्यात आले. त्यानंतर संचलनास सुरवात झाली. सुरवातीलाच open जीप वर ध्वज अग्रेसरीका व ध्वज रक्षिका विराजमान झाल्या.
संचलन मार्गावर उत्स्फूर्तपणे पुष्प वृष्टी, घोषणा बाजी करून नागरिकांकडून छान स्वागत करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातून चार तालुक्यांतील सेविका खास संचलनासाठी आल्या होत्या .
सांगली जिल्ह्याचे ही संचलन याच दिवशी याच वेळी 22 ऑक्टोबर 2023 सकाळी 8 वाजता पटवर्धन हायस्कुल येथून सुरू झाले. सांगली जिल्ह्यातील एकूण ४ तालुक्यांचा (मिरज, ईश्वरपूर, तासगाव, आटपाडी) सेविकानी सहभाग नोंदविला.
हिराबाग कॉर्नर – पंचमुखी मारुती मंदिर – राम मंदिर चौक – वेलणकर मंगल कार्यालय – खण भाग – बदाम चौक येथून मार्गक्रमण करत परत पटवर्धन हायस्कूल ला या संचलनाची सांगता झाली.
खेलो इंडिया युथ गेम्स मधील वेट लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक मिळविलेल्या काजल सरगर ह्या विजेती खेळाडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. विजेती खेळाडू व सांगली जिल्हा पालक सुमन ताई गाडगीळ (वय८७) याच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.
Tags: NULL