आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आज एकदिवसीय विश्वचषकातील २६वा सामना खेळला जात आहे.
हा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एकिकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानचा संघ तिसऱ्या विजयासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
पाकिस्तानला मागील तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता . आजच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभवाची खपली काढून टाकण्याचा प्रयत्न करेल. तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीतील स्थान आणखी पक्के करण्याचा उद्देशाने मैदानात उतरलेले आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण ८३ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५१ सामने जिंकले आहेत. तर, पाकिस्तानला ३० सामन्यात विजय मिळवता आला आहे. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला आहे.
दरम्यान २ वाजता ह्या सामन्याला सुरवात झाली असून पाकिस्तानने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ७ ओव्हर्स मध्ये पाकिस्तानच्या ४३ धावा झाल्या असून दोन गडी बाद झाले आहेत.