देशात महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा बसावा यासाठी केंद्र सरकारकडून कडक कायदे करण्याबाबतच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बलात्कार विवाहबाह्य संबंधातून केली जाणारी फसवणूक अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे.
विवाहित असताना अविवाहित असल्याचा दिखावा करून किंवा खरी ओळख लपवून लग्न करणाऱ्यांना आता यापुढे 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कारण केंद्र सरकार लवकरच याबाबत विधेयक आणणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून विशेष म्हणजे याबाबतच विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये आपली ओळख लपवून, धर्म लपवून, जात लपवून लग्न करणारे किंवा संबध प्रस्थापित करणाऱ्या पुरुषांवर देखील कडक कारवाई करण्याबाबतचा कायदा असणार आहे.
यामुळे एखाद्या व्यक्तीने आपली ओळख लपवून लग्न केलं किंवा महिलेशी संबंध प्रस्थापित केले. तर तो बलात्कार मानला जाणार नाही. पण छळ नक्कीच मानला जाईल. तसेच संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल.