सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आज सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू आहे. यावेळी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे , मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, विशेष निमंत्रित मंत्री दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर, समितीचे सदस्य मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, योगेश कदम, भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ , मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित आहेत.
मराठा आरक्षण उपसिमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे याची प्रतीक्षा आहे.उपसमितीसोबतच्या या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.