मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मराठा समाज आणि राज्यातील जनतेचं लक्ष वेधले.
आम्ही मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार असून क्युरेटिव्ह पिटीशन आणि शिंदे समितीच्या मार्गाने आम्ही हे आरक्षण देणार आहोत ,तसेच उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मराठा समाजाने सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी या वेळी केले.
“मराठा आरक्षणाचं आंदोलन आता वेगळं वळण घेत आहे, ते भरकटले आहे. याची मनोज जरांगे यांनी नोंद घ्यावी. तसेच मला वाटते की दोन्ही बाजूंनी आपण पुढे जात आहोतच तरी सरकारला थोडा वेळ द्या. आम्ही सकारात्मक आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले आहेत.
राज्यात कायदा सुव्यवस्था आबाधित राखणे ही सरकारची जशी जबाबदारी आहे, तशीच नागरिकांचीही आहे. मराठा समाजाला कुठलाही गालबोट लागू नये याची काळजी मराठा क्रांती मोर्चानं घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.