आमदार अपात्रता सुनावणीच्या दिरंगाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आजही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वेळापत्रक फेटाळले असून अत्यंत कठोर शब्दांत राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली.
तसेच, 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर ३१ डिसेंबर २०२३ च्या आधी निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.