▪️डी- लिस्टिंग महामेळाव्याला नाशिकमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद.▪️
नाशिक दि. 29 – आदिवासी समाजावर गेली 70 वर्ष झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्र तर्फे आज भव्य डी – लिस्टिंग महा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नाशिक पुणे नगर तसेच सोलापूर जिल्ह्यातून हजारो जनजाती बांधवांनी सहभागी होऊन,धर्मांतरित आदिवासींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळण्याची एकमुखी मागणी केली.
महामेळाव्याच्या सुरुवातीला गोल्फ क्लब मैदान येथून भव्य रॅलीचे आयोजन करून शहराच्या विविध भागातून रॅलीने मार्गस्थ होत हुतात्मा अनंत कान्हेरी मैदानावर भव्य महामेळाव्यात त्याचे रूपांतर झाले.
‘कोंबडं हरवलं, कंच्या देवाला मानविलं’ आणि ‘गौराई चाललीव’ या व यांसरख्या लोकागीतांवर गोप नृत्य, पावरी (तारपा), फुगडी नृत्यी यांसारख्या परंपरागत आदिवासी लोकनृत्याच्या सादरीकरणाने जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्रच्या वतीने नशिक येथे २९ ऑक्टोबर रोजी गोल्फ क्लब मैदानावर आयोजित डी-लीस्टिंग महामेळाव्याची सुरुवात झाली. प्रसिद्ध आदिवासी राजकीय नेते स्वर्गीय श्री बाबा कार्तिक उंराव यांची जयंतीच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या जनजातियांच्या मोर्चाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तारपा नृत्याने मोर्चाची सुरुवात करत गोल्फ क्लब मैदानावरून मोर्चा निघाला आणि त्र्यंबक नाका सिग्नल, अण्णाभाऊ साठे पुतळा, कालिदास कला मंदिर, शिवसेना भवन, सी बी एस सिग्नल वरून त्र्यंबक नाकामार्गे पुन्हा गोल्फ क्लब मैदान येथे त्याचे महामेळाव्यात रूपांतर झाले. डी-लीस्टिंग म्हणजेच धर्मांतरीत व्यक्तींना अनुसूचित जमतींच्या यादीतून वगळण्यासाठी सरकारकडून मागणी करण्याकरिता सगळा आदिवासी समज जमला होता. निव्रुत्त जिल्हा न्यायाधीश, मध्य प्रदेश येथील जनजाती गौंड नेते निवृत्त न्यायाधीश प्रकाश उईके यांची प्रमुख वक्ते म्हणून मेळाव्यासाठी उपस्थिती राहिली. जनजाती समाजावर डी लिस्टिंग कायदा नसल्यामुळे कशाप्रकारे नुकसान होत आहे याची अत्यंत सूत्रबद्ध मांडणी केली. माऊलीधाम, त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज (देवबाप्पा ) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. धर्मधाम आश्रम, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा येथील प. पू. श्री रामणगिरी गुरु यांची देखील विशेष उपस्थिती या मेळाव्याला होती.
Tags: NULL