मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यवतमाळ किन्ही गावात शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी दाखल झाले.
मुख्यमंत्री मंचावर पोहोचले. त्यावेळी काही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर जोरदार गोंधळ उडाला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीच सुरु केली.कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलीसही सतर्क झाले.पोलिसांकडून तातडीने कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.विशेष म्हणजे गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता.