मराठा आरक्षणासाठी परत एकदा उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणााचा आज सातवा दिवस आहे. दिवसेंदिवस मराठा आरक्षण आंदोलन उग्र रूप घेत असल्याचे दिसत आहे. अशातच मनोज जरांगे आरक्षणाबाबतचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय फेटाळला आहे.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा केली मात्र जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. अर्धवट आरक्षण घेणार नाही, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने तातडीने अधिवेशन घ्यावे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा आरक्षणावर झाली, मात्र नोंदीनुसार आरक्षण घेण्यास आम्ही नकार दिला. 2004 च्या जीआरमध्ये 83 क्रमांकाला दुरुस्त करा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.. विशेष अधिवेशन घ्या,समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या.असे मनोज जरांगे यांनी म्हणले आहे.
तसेच या वेळी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्यापेक्षा चर्चा करण्यासाठी पुढे या, असे आवाहन मनोज जरांगे यांनी राजीनामा देणाऱ्या आमदार – खासदारांना केले आहे.