सध्या राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दुपारी ऑक्टोबर हीट तर पहाटे थंडी पडायला सुरवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र थंडी जाणवत असताना मुंबई व कोकण विभागात तापमानात बदल दिसून येत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात घट होत असताना मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ होत आहे. हे तापमान किमान पाच दिवस तरी असेच चढते राहील.असा हवामान खात्याचा अंदाज आहे.