मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे तसेच मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असेही म्हणले आहे.
आज ठाकरेंनी सकाळी पत्रकार परिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिले आहे.
मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहे हे मराठा समाजाला आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिले .त्यासाठी हायकोर्टात जे चॅलेंज दिले गळे पण ते टिकवण्याचे काम देवेंद्रजी आणि आम्ही केले पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मुख्यमंत्री कोण होते ? उपसमितीचे अध्यक्ष कोण होते असा सवाल करत यांनी हे आरक्षण टिकवले नाही. त्यामुळं मराठा समाजाचे खरे मारेकरी तुम्ही आहात. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
मराठा आरक्षण घालवण्यास उद्धव ठाकरे हेच जबाबदार असून आम्ही ते पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आम्ही इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी एका समितीची स्थापना केलेली आहे. त्याद्वारे पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.