मनोज जरांगे पाटील टप्प्या टप्प्याने मराठा अरक्षणसाठीच्या आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत.तसेच राज्यातील मराठा समाजही आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत आरक्षणावर तोडगा काढण्यावर चर्चा होणार आहे.मराठा आरक्षणा संदर्भात ही बैठक सह्याद्री अतिथिगृह, मुंबई इथे चालू आहे.
शरद पवार ,अशोक चव्हाण , अंबादास दानवे , उदयनराजे भोसले ,संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते या बैठकीसाठी आमंत्रित आहेत. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था टिकवण्याकरता सर्वपक्षीयांचा सहयोग आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तसेच आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याकरता सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींनी आवाहन करणे गरजेचे असल्याचेही राज्यसरकारकडून मत मांडण्यात येत आहे. या बैठकीला सर्व पक्षीयांना निमंत्रण असले तरी मात्र, ठाकरे गटाला वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.