आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं मराठा आंदोलन गेले काही दिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ठिकठिकाणी हिंसक घटना समोर येत आहेत.अशात राज्यात ठिकठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात आमदारांच्या घराला पेटवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर बीडमध्ये संचारबंदी करण्यात आली. आता ३६ तासात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तर धाराशिवमध्ये संचारबंदी कायम आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातही जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने आता ग्रामीण भागासाठी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे, या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे. दरम्यान तणावपूर्ण घटना टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट बंद करण्याचे गृह विभागाने आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांना या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे. आज शाळा, बस, बाजारपेठ बंद असणार असुन शाळेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत
या भागांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्यामुळे खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.