आज पुन्हा एकदा शिवसेना आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू झाली आहे. विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत.३४ याचिकांचं सहा गटात वर्गीकरण करण्यात आले असून या प्रमुख याचिकांवर आज सुनावणी होत आहे.ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनील प्रभू आणि अजय चौधरी सुनावणीला उपस्थित आहेत.
यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाचा व्हीप हा घटनाबाह्य आहे, असा युक्तिवाद केला.नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही ह्या त्यांच्या युक्तिवादानंतर त्यानंतर अध्यक्षांनी “मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे”, असे वक्तव्य केले. त्यानंतर दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या सुनावणी दरम्यान व्हीपच्या मुद्द्यांवर चांगलाच गोंधळ झाला.ईमेल मिळाल्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली बघायला मिळाली. दरम्यान पुरावे सादर करण्यास दोन्ही गटाने सहमती दर्शवली आहे. तसेच फेरसाक्ष घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी देखील याला सहमती दर्शवली असून पुरावे सादर करण्यास आता वेळ दिला जाईल. सुधारीत वेळापत्रकानुसार आता पुढची प्रक्रिया ठरणार आहे.