आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. आता पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्षांनी १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शिंदे गटाला दिले आहेत.
सुनावणीदरम्यान व्हीप संदर्भात प्रश्न निर्माण करण्यात आला.शिंदे गटाने मेल मिळालाच नाही असे सांगितले.त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात गोंधळ निर्माण झाला.
याबाबत पुरावे सादर करण्यास दोन्ही गटांनी सहमती दर्शवली असून तसेच फेरसाक्ष घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी देखील याला सहमती दर्शवली आहे. पुरावे सादर करण्यास आता वेळ दिला जाणार असून सुधारीत वेळापत्रकानुसार आता पुढची प्रक्रिया ठरणार आहे.