राज्यसरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गेले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास हरकत नाही असे वक्तव्य केले आहे . त्यानंतर त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ देत उपोषण तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी समोर आली आहे.
यावेळी वेळ घ्या पण आरक्षण द्या, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसेच आता दिलेला वेळ शेवटचा आहे, असेही जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.तसेच २ जानेवारीनंतर मुंबईचं नाक बंद करु असा इशारा दिला आहे.