इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातून पळून गेलेला दहशतवादी शाहनवाज आलमला एनआयएने झारखंडमध्ये बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे.
दहशतवादी शाहनवाजनेच गोळीबार तसेच स्फोटके तयार करण्याच्या प्रशिक्षणात सक्रिय भूमिका बजावली होती.पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता.मात्र 19 जुलैला पुणे पोलिसांपासून पळून जाण्यात तो यशस्वी ठरला होता.तसेच तो दहशतवादी संघटनेच्या कारवायांना प्रोत्साहन देण्यात सक्रिय सहभागी असल्याचे समोर आले आहे.