राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर सोमवारी निकाल येणार आहेत.मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांना महत्व आले आहे.
राज्यातील दिग्गज नेत्यांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे .ग्रामपंचायत निवडणुकीत दबदबा कायम राहावा आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नेते सकाळीच त्यांच्या गावात, मतदान केंद्रावर पोहचले आहे.सहपरिवार, कुटुंब, कार्यकर्त्यांसह त्यांनी मतदान केले आहे .तसेच मंत्री, आजी-माजी आमदार, खासदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वच जण आवाहन करत आहेत ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी अनेक ठिकाणी राजकीय नेते या निवडणुकांमध्ये थेट सहभागी आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे..