काल राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले एकूण ७४% मतदान झाले. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आतापर्यंत आलेल्या निकालांमध्ये भाजपा, अजित पवार गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात चुरस पाहण्यास मिळते आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवार गटाने ८१ तर भाजपाने ८८ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राज्यात एकूण २३५९ ग्रामपंचायती आहे. आतापर्यंत आलेल्या निकालांमध्ये महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सध्या निकालाचे कल पाहता सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष ठरला आहे . तर 2 नंबरला राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. तीन नंबरला शिवसेना शिंदे गट आहे आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गट, तर पाचव्या क्रमांकावर ठाकरे गट आहे.