सनातन भारतीय संस्कृती मध्ये अनेक धन संपदांचा उल्लेख आहे परंतु या सर्वामध्ये श्रेष्ठ आरोग्य धन आहे. कारण कुठल्याही धन संपदेचा उपभोग एक निरोगी व्यक्तीच घेऊ शकते. दैवी आणि दानावी प्रवृत्तीच्या समुद्र मंथनातून प्रकलेली 14 रत्ने त्या पैकी सुवर्ण अमृत कलश हातात घेऊन प्रकलेले भगवान धन्वंतरी हे विष्णू चे 12 वे अवतार मानले जातात. निळवर्ण, चतुर्भुज,निरोगी काया आणि हातात रक्तपिती जळू, सुवर्ण अमृतकुंभ, शंख आणि जडी बुटी. काही प्रतिमा मध्ये ग्रंथ, चक्र ही दाखविलेले आहे हे सर्वच आयुर्वेदमध्ये विविध चिकित्सा पद्धतीचे प्रतीक आहेत.
भगवान धन्वंतरी हे जीवसृष्टी चे प्रथम वैद्य आहेत. भारतात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. भारतीय सनातन संस्कृतीत सर्वच सन अत्यंत शास्त्र शुद्ध स्वरूपात साजरे करण्याचे विधान आहे आणि त्या प्रत्येक विधिला शास्त्रीय आधार आहे. प्रत्येक कथा ही प्रतिकात्मक असून आपण त्याचा मतीतअर्थ समजावून घेणे काळाची गरज आहे. जसे खरे तर हे दैवी दानावी वृतीचे मंथन म्हणजेच मनाच्या सात्विक आणि तमासिक वृत्तीचे मंथन जे अनंत काळापासून सुरु आहे. मंथनमधून प्रथम काळकूट विष बाहेर आले साहजिकच आहे कुठल्या चर्चेतून प्रथम नकारात्मक ऊर्जाच निर्मित होते. कारण प्रत्येक वृत्ती स्वतःच योग्यतेच पुरावे देते. हे हलहाल गिळूनही चालत नाही आणि हवेत सोडून ही दोनीही विनाशकारक.म्हणूनच शिव म्हणजे सनातन सत्य असे विष शक्ती च्या मदतीने कंठात धारण करू शकतो.
ह्या मंथनाचा मेरू स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णुने धारण केलेला कुर्म अवतार, मंथनाचा मेरू स्थिर ठेवण्यासाठी संकीर्णतेच्या गुणाला धारण कारण्याचीच प्रेरणा देते आहे प्रत्येकाच्या विचाराचा आदर करूनच अमृत रुपी ज्ञान मिळू शकते.अमृत हे आयुर्वेदाचे परम ज्ञान जे दीर्घायु प्रदान करते.हे तना मनाचे आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपल्यामधील तामसिक असुरी प्रवृत्ती म्हणजे काम क्रोध, मद , लोभ मत्सर अहंकार, प्रमाद इत्यादी असतील तर आरोग्य मिळू शकणार नाही कारण ह्या सर्व वृत्ती मोहिनी च्या वश मध्ये असतात म्हणूनच दानव ह्या अमृताचे पान करू शकले नाहीत. धैर्य, शांती, प्रेम,समर्पण, दानत,क्षमाशिलता, पवित्र्य असलेल्या सात्विक दैवी संपदा या आरोग्य रुपी अमृताच्या अधिकारी असतात. आयुर्वेद मध्ये विविध सूत्रे वापरून प्रकृती कडून प्राप्त होणाऱ्या वन औषधी, भूमी खनिज औषधी, जीवाष्मा पासून आणि समुद्रातून मिळणाऱ्या विविध खनिजा पासून औषध निर्मिती करून संपूर्ण आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते. भुरचनेनुसार ज्या प्रदेशात जे उपलब्ध असेल त्याप्रमाणे सूत्रे ठरवून मात्र बनविल्या गेल्या.
भगवान धवन्तरीच्या धवन्तरी संहिता तसेच त्याच्या कडून जसे जसे हे ज्ञान पुढे गेले तसें अनेक ऋषी मुनिंच्या संशोधनातून काळानुरूप यात बदल हॊत गेले. या मध्ये रावणाचे सुद्धा योग दान आहे नाडी परीक्षनाची विधी दिली.महर्षी चरक, वागभट्ट, महश्री सुश्रुत इत्यादी च्या अथक परिश्रमा मधून चरक संहिता, शक्ल्य चिकित्सा, अष्टांगसंग्रहम ,अष्टाङ्गहृदयम् सारखे अनेक महान ग्रंथची संपदा आपल्याला लाभली आहे. कुठल्याही प्रकारचे दुष्प्ररिणाम नसलेली ही सनातन चिकित्सा पद्धती पुन्हा आत्मसात करून आपण खऱ्या अर्थाने धनत्रयोदशी साजरी करूया.
वाढलेले पंच तारांकीत मोठे मोठे हॉस्पिटल, गल्ली गल्ली मध्ये असणारे दवाखाने हे समाजाच्या खालावत चाललेल्या आरोग्याचे प्रतीक आहेत. अकस्मात प्रकट होणारे विविध आजार आणि घटत चालेले आयुर्मान, मानसिक तणाव आणि त्यातून उद्भवणारे मानसिक विकार आणि वाढलेल्या आत्महत्या आपल्याला पुह्ना एकदा एका विचार मंथनासाठी प्रवृत्त करत आहेत. प्रकृतीचे एक अंग असलेला मनुष्य ज्यावर प्रकृतीच्या संवर्धची जबादारी होती प्रकृतीला आपली गुलाम समजून ज्या पद्धतीने विकास करत आहे त्यामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. दररोज घटनारी जंगले , बांधावरची आणि परस बागेतली नष्ट होत चाललेली जडिबुटी आपल्याला निश्चितच निरोगी भविष्य देऊ शकत नाही.तेव्हा आता क्षणभर विचार करुन पुनःश्च सनातन ऋषीमुनिंनी दिलेल्या निरोगी जीवन पद्धतीचा अवलंब करणे, आणि आयुर्वेदला केंद्रस्थानी ठेवून, आहार विहार करून समाज आणि सृष्टी चे आरोग्य, धनसंपदेत रूपांतरित करून सुखी आणि खऱ्या अर्थाने समृद्ध भारत बनविण्याची गरज आहे
गव्यासिध्द संगीता आवारी ,
खराडी, पुणे
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र