सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या.मात्र त्या भुजबळांच्या घरी जाण्यापूर्वीच सांताक्रूझ पोलिसांनी त्यांना रोखले असून ताब्यात घेतले आहे. सध्या अंजली दमानिया यांना जुहू पोलीस ठाण्यात आणले आहे. यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची असल्याचे वृत्त समोर येत आहे
काल जालना जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्याबाबत आक्रमक भाषण केले होते. त्या भाषणानंतर अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भुजबळांवर टीका केली होती.