सुप्रीम कोर्टाने २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात दोन महिन्यात जास्तीत जास्त मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते.मराठी पाट्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने उद्याची शेवटची तारीख दिली आहे. दुकानावर उद्यापासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे मनसे मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर देखील अद्यापही बहुतांश ठिकाणी तशा पाट्या लावण्यात आलेल्या नाही. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता 25 तारखेपर्यंत व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांवर मराठीत पाट्या लावल्या नाही तर मनसे आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.