वाचाळविरांनी क्षमतेपेक्षा जास्त बोलू नये, औकातीत जेव्हढे आहे तेवढेच बोलावे असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर असताना वाचाळविरांचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे . त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत.स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तुत्वाने उभा राहिलेला महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीच. असे बावनकुळे यांनी म्हणले आहे.