उत्तराखंड येथील उत्तरकाशी टनल मध्ये मागील चौदा दिवसांपासून ४१ कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर काम चालू आहे. यादरम्यान कछयारी-भंगवार फोरलेन प्रोजेक्टसाठी बांधल्या जात असलेल्या ट्विन टनल मध्ये सुरक्षेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) ने अॅडव्हायजरी जारी केली आहे.
त्या अंतर्गत आता बोगद्याच्या खोदकामादरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी पाईपलाइन टाकण्यात येणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचे काम करणाऱ्या कंपनीने या नव्या गाईडलाइन्सच्या अंमबजावणीचे काम सुरु केले आहे.
पुढील काळात आता बोगद्याचे उत्खनन तसेच कोणत्याही संभाव्य धोक्याचा किंवा अपघाताचा सामना करण्यासाठी मदत आणि बचाव कार्यासाठी पाईप टाकण्याचे काम केले जाणार आहे.
१२ नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी पहाटे ५. ३० च्या सुमारास सिल्क्यरा-दांदलगाव बोगद्याचा काही भाग कोसळला आणि ४१ कामगार आत अडकले आहेत. . सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठीचं रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात आले असले तरी खोदकाम सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे बचावकार्य पुन्हा थांबवण्यात आले आहे.