राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली असून या पार्श्वभूमीवर दुकानांवर देवनागरी लिपीत ठळक मराठीत पाटी नसल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.त्याबरोबरीने दुकानांची नावे मराठीत न झाल्यास ‘खळ्ळखट्याक’चा इशारा मनसेतर्फे देण्यात आला होता.
मात्र अजूनही दुकानदारांकडून कोर्टाच्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी करताना दिसत नसल्यामुळे आता मनसे आक्रमक होत रस्त्यावर उतरली आहे. . रविवारी सकाळीच दहिसर, ठाण्यात मनसेचे खळखट्ट्याक पाहायला मिळाले तसेच मुंबईच्या कुर्ला येथे मराठ्या पाट्यांसाठी मनसे आक्रमक झाली होती. चांदीवलीचे मनसे विभाग प्रमुख महेंद्र भानुषाली यांनी मॉलमध्ये जाऊन ज्या-ज्या दुकानांवर मराठीमध्ये साईन बोर्ड नाहीत त्याला काळे फासण्याचा थेट इशारा दिल्यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आला आहे.
तसेच 28 नोव्हेंबरपासून ज्या-ज्या दुकानदारांनी मराठीत पाट्या लावल्या नसतील त्यांच्यावर मनपाकडून दंड आकारण्यात येणार आहे.मनसेचे मराठी पाट्यांसाठी खळ्ळ खट्याक आंदोलन सोलापुरातही पहायला मिळाले .नवी पेठ व्यापारी परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी पाट्यांवर काळे फासलं तर काही पाट्यांची तोडफोड केली. दोन दिवसांत जर मराठी पाट्या लावल्या नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.