उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यातून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यात प्रशासनाला अखेर १७ दिवसांनंतर यश आले आहे. टप्प्याटप्प्याने या कामगारांना बोगद्यातून बाहेर काढले जात आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री धामी आणि केंद्रीय मंत्री व्हिके सिंह यांनी टनेलमधून बाहेर आलेल्या मजुरांचं स्वागत केलं आहे.
आतापर्यंत ३३ मजूर बाहेर पडले आहेत. बोगद्यात अडकलेल्या या कामगारांची सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा आणि तात्पुरतं रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.