केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील धर्मतला येथे एका जाहीर सभेत भाषण करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच आम्ही देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए लागू करणारच असा ठाम निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला . नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) हा देशाचा कायदा आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि आम्ही तो लागू करुच, असे स्पष्ट उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या वेळी काढले आहेत
अमित शाह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रातून लाखो रुपये पश्चिम बंगालच्या जनतेसाठी पाठवत आहेत. परंतू, राज्य सरकार ते जनतेपर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यामुळे राज्यातील जनतेने हे निश्चित केले आहे की, आगामी सरकार हे भाजपचेच असेल.. तसेच पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून या घुसखोरीमुळे राज्याचा कधीच विकास होणार नाही, असे ही अमित शाह यावेळी म्हणाले आहेत. .