पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सध्या दुबईत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतीक जलवायू कारवाई शिखर संमेलनाला हजेरी लावली. या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले .
यावेळी मोदी म्हणाले, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यामध्ये संतुलन राखल्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून भारत जगासमोर उभा आहे. तसेच यावेळी त्यांनी पुढची COP33 ही आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात घेण्याचा प्रस्ताव ठेवला.त्याचबरोबर भारत राष्ट्रीय स्तरावर निश्चित करण्यात आलेले लक्ष्य प्राप्त करण्याच्या मार्गावर असून निश्चित केलेल्या वेळापूर्वीच ११ वर्षे आधीच भारताने आपलं कार्बन उत्सर्जन तीव्रतेचे लक्ष साध्य केलं आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत. .
गुरुवारी दुबईत पोचलेले पंतप्रधान मोदी ‘वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट’ परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. तीन उच्च-स्तरीय साईड इव्हेंटमध्ये भाग घेणार आहेत.