मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्ष पुन्हा सरकार बनवण्याकडे दमदार वाटचाल करताना दिसत आहे. यंदा मध्य प्रदेशात बंपर मतदान झालेअसून या मतदानात महिलांचा वाटा लक्षणीय दिसून आला होता.यावेळी महिलांनी शिवराजसिंह चौहान यांनी साथ दिली. शिवराज सरकारची ड्रीम योजना लाडली लक्ष्मी योजना आणि लाडली बहना योजनेची जादू चालली आणि काँग्रेसच्या गॅस सिलेंडर मोफतच्या आश्वासनाही मतदार बळी पडले नाही. यंदा सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजप १६० जागांवर आघाडी घेत पुन्हा सरकार बनवण्याकडे वाटचाल करत आहे.दुसरीकडे कॉग्रेसला ७१ जागांवर समाधान मानावे लागले आहे.