लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आज तीन राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याची जादू पुन्हा एकदा दिसून आली आहे. भाजपने काँग्रेसची दोन राज्यं खेचून आणत लोकसभेच्या विजयाचा तर मार्ग प्रशस्त केलाच . न भूतो, न भविष्यती अशी कामगिरी केली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे तर तेलंगणामध्ये मात्र, काँग्रेसला पहिल्यांदाच सरकार स्थापन करण्यात यश मिळाले आहे.
या तीन राज्यातील दमदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि जनतेला संबोधित केले .आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला आहे. आज वंचितांच्या विचाराचा विजय झाला आहे.
आता तरी सुधरा नाही तर जनता तुम्हाला साफ करेल, हाच या निवडणूक निकालातून जनतेने इशारा दिल्याचे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले आहेत.