मिझोराममध्ये विधानसभेच्या ४० जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते यानंतर आज ४ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
विविध संस्थांच्या एक्झिट पोलनुसार, याठिकाणी झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तसेच सध्या सत्तेत असणाऱ्या मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) देखील पुन्हा एकदा सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
झोराम पीपल्स मूव्हमेंटने (ZPM) आतापर्यंत ९ जागांवर विजय मिळवला आहे, तसेच १७ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुरीकडे MNF ने मामित विधानसभा जागेवरून पहिला विजय मिळवून आपले खाते उघडले आहे. तर सध्या MNF 9 जागांवर आघाडीवर आहे.