बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचे उच्च दाब क्षेत्रात रूपांतर झाले असून त्याचे आता चक्रीवादळ मिचॉंगमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे ४ डिसेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या परिसरात ३५ ते ८० किमी वेगाने वारे वाहत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या चक्रीवादळामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस सुरु आहे. रस्ते पाण्यात गेले आहे. रस्त्यांवर असलेल्या गाड्या पाण्यात वाहून जात आहे. सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली असून लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळ पाण्यात बुडाले आहे. यामुळे अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.