भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिणीनिर्वाण दिन आहे.या निमीत्त राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार चैत्यभूमीवर दाखल झाले होते.चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अभिवादन केले आहे.
आज मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबईच्या वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे. मध्यरात्री पासून अनेक भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी मदत कक्ष देखील उभारण्यात आले आहे. चैत्यभूमीवर कालपासूनच बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जमले आहेत राज्य सरकारने विशेष कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे.