राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार कांदा निर्यात बंदीविरोधात मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होत आहे. याच सभेतून पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे देशाच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बाजार भाव देखील पडले, तसेच बाहेर देशात जाणारा माल देखील अडकला त्यांचे ही नुकसान झाले.संपूर्ण देशातील निर्यात थांबवली आहे, असे पवार यांनी म्हणले आहे.
केंद्रसरकारचा हा कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे
शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही, हे दुर्दैव आहे. मी कृषीमंत्री असताना कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे स्पष्ट सांगितले होते. परंतु आताचे सरकार ते करु शकत नाही. रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही.