राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भाजपने भजनलाल शर्मा यांचे नाव जाहीर केले आहे.वसुंधरा राजे आणि बाबा बालकनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे नाव जाहीर करण्यात आले.विशेष म्हणजे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज जयपूरमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यातच हा निर्णय घेण्यात आला असावा या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विनोद तावडे, सरोज पांडे, वसुंधराराजे, सिपी जोशी हे भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने ज्याप्रकारने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.त्याप्रमाणे राजस्थानमध्येही मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा असेल असे संकेत मिळत होते. भाजपने राजस्थानमध्ये निवडणूक प्रचारावेळी किंवा नंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता .भजनलाल शर्मा यांना संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी मुख्यमंत्रीपद दिले गेले असल्याचे बोलले जात आहे.
यासोबतच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे दोन उपमुख्यमंत्री असतील. तर वासुदेव देवनानी विधानसभा अध्यक्ष असणार आहेत.