महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. तसेच राज्यातील जागावाटपबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. नागपुरात ही सत्ताधारी पक्षांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला समन्वय समितीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप कसे केले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.