संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना, लोकसभा सभागृहात कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याची घटना समोर आली आहे. यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.
भर लोकसभेत हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. या तिघांकडे स्प्रे असल्याची माहिती मिळत आहे. स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली. त्यांच्या हातात टिअर गॅस होता. हा पिवळा गॅस घेऊन ते सभागृहात शिरले होते. त्यामुळे सर्वच जण धास्तावले होते.अखेर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना जेरबंद केले. मात्र लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान,ज्या व्यक्तींनी गॅलरीतून उडी मारली त्यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजत आहे तो कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे.
आजच्याच दिवशी २२ वर्षापूर्वी म्हणजे १३डिसेंबर २००१ रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. त्यावेळीही संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते बरोबर २२ वर्षानंतर आजच दोनजण संसदेत शिरल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.