आज मध्य प्रदेशात मोहन यादव यांनी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील परेड ग्राउंडवर सकाळी 11.30 वाजता हा सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याचा केंद्र सरकारमधील अनेक नेते उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली