लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ३१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, दयानिधी मारन यांचा समावेश आहे.
आजही विरोधी पक्ष संसदेच्या सुरक्षेबाबतच्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला होता.त्यानंतर या सर्व ३१ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या काळापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर संसदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. या आधी दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते.
त्यामुळे आता पर्यंत निलंबित खासदारांची संख्या ४७ झाली आहे.