टिळक स्मारक मंदिर शताब्दी प्रारंभानिमित व्याख्यान
सांगली : आपला देश आता उपेक्षित राहिला नाही. देश चौफेर प्रगती करतोय जगाचे लक्ष आता भारताकडे आहे. प्रगती आणि शांती यांचे संतुलन साधत विकास करण्यासाठी जगाला सनातन धर्माची गरज आहे असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ डॉ भागवत यांच्या हस्ते झाला. प्रचंड जनसमुदायासमोर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले की, राज्याचा त्याग करून 14 वर्ष वनवास भोगलेला राम आमचा आदर्श आहे.
विचार व व्यवहाराचे संतुलन राखून कार्य करणाऱ्यांना समाजात अढळ स्थान आहे.
लो. टिळकांनी कधी सत्याची कास सोडली नाही कुठ्ल्याही प्रसंगाला ते सम चित्ताने सामोरे गेले. छ्त्रपती शिवाजी महाराजांनंतर असे आचरण करणारे टिळक पहिलेच होते. जग आपल्याकडे आशेने बघतेय
विज्ञानाने प्रगती केली जीवन सोप झालं आयुष्यमान वाढले पण हिंसा, कलह ,कट्टरपणा वाढला. शांती समाधान हरवलं आहे. सद्य परिस्थितीत जगाला सनातन धर्माची तहान लागली आहे. विश्वगुरु म्हणून जग आपल्याकडे पाहते आहे. सनातन विचारानेच शांती राहील जग निरामय होईल याचा विचार करा आणि पायरी पायरीने प्रवास करा असेही आवाहन डॉ भागवत यांनी यावेळी केले.
धर्म म्हणजे काय?
डॉ भागवत म्हणाले धर्म राहिला पाहिजे धर्म म्हणजे पूजा अर्चा नाही तो त्याचा एक भाग आहे. धर्म म्हणजे सृष्टीला जोडून ठेवणारा होय. सत्य करुणा पवित्रता परिश्रम जेथे असतील तिथे धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीयांचा स्व म्हणजे भगवदगीता
डॉ भागवत म्हणाले टिळकांनी कार्याचे अधिष्ठान म्हणून गीतेचा स्वीकार केला अध्यात्म आणि चिंतन हा जीवनाचा पाया असतो. जीवनाला दिशा देण्याचे काम उपनिषद करतात. गीता ही उपनिषदाचा सारांश आहे. भगवदगीता भारतीयांचा स्व आहे तरुणांनी गीता वाचली पाहिजे आचरणात आणली पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रकाश बिरजे यांनी पू..सरसंघचालक यांचा परिचय करून दिला. मनीषा काळे यांनी टिळक स्मारकच्या आगामी उपक्रमाची माहिती दिली. अजय तेलंग यांनी गीत सादर केले. सूत्र संचालन रवींद्र गीते यांनी केले..
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे