शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणीचा टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आज अंतिम युक्तीवाद करणार आहेत.
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून विधानसभा अध्यक्षांसमोर गेले तीन दिवस ही सुनावणी पार पडली . यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवादाकरता देण्यात आला होता.सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुभा दिली आहे. याआधी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती.
साधारणतः दीड वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेला आमदार अपात्रतेच्या वादाचा निकाल हा 10 जानेवारीपर्यंत लागणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत आणि शिंदे गटाकडून अॅड. महेश जेठमलानी हे युक्तिवाद करत आहेत.