.महाराष्ट्र सदन घोटाळा याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील 3 आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचे कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने खटल्यातील आरोपींची विनंती मान्य केली असून आज सत्र न्यायालयात यासंदर्भात सुनावणी घेण्यात येणार आहे.
आरो[पीच्या अर्जावर आजच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले होते. अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन आरोपी अटकेत आहेत. या तिनही आरोपींनी माफिचा साक्षीदार होण्याकरता अर्ज दाखल केला आहे. तर मुख्य आरोपी छगन भुजबळ यांनी याप्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांची सुनावणी व्हायच्या आधी आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर निर्णय घ्यावा, ही या तिघांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली असल्यामुळे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.