सरकारचे शिष्टमंडळ आज मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार मनोज जरांगे यांच्याकडे अधिक वेळ मागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहितीसुद्धा जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने देण्यात येईल.
मंत्री गिरीश महाजन , उदय सामंत आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा या शिष्ठमंडळात समावेश असेल.
मराठा आरक्षणासाठीची जरांगे यांनी राज्यसरकारला दिलेली मुदत २४ डिसेम्बरला संपणार आहे. त्यानंतर आपण पुन्हा आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे जरांगे यांनी म्हणले आहे.