संसद सुरक्षाभंगाप्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता केंद्र सरकारने संसदेची सुरक्षा सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फॉर्स Central Industrial Security Force (CISF) कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाच्या अखत्यारीत आता संसदेची सुरक्षा असणार आहे. गृह विभागाच्या अखत्यारीत आता संसदेची सुरक्षा असणार आहे. याआधी संसदेची सुरक्षा दिल्ली पोलिसांकडे होती.
CISF हे एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे असून ते सध्या केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालयाच्या इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळते.
१३ डिसेंबरला काही तरुणांनी संसदेच्या सभागृहात शिरून धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.