काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी केदार यांना दोषी ठरवलं आहे.तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केले आहे.
कोर्टानं सुनील केदार( तत्कालीन बँक अध्यक्ष), केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी मानले आहे. तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केले आहे. दरम्यान, सध्या कोर्टात शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद सुरु आहे. या सहा दोषींचे वकील युक्तिवाद करत आहेत.
बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणाचा निकाल आज सत्र न्यायालयात लागणार आहे. बँकेत २००२मध्ये १५२ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत.