कर्नाटकमधील काँग्रेस सरकार राज्यात लागू केलेली हिजाबवरील बंदी उटवणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाबवरील बंदी उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना देताना सिद्धरामय्या म्हणाले, “प्रत्येकाला त्याच्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे.”
हिजाब बंदी राज्यात 2022 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पहिल्यांदा लागू केली होती. माजी मुख्यमंत्री बी बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये डोके झाकण्यावर बंदी घातल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
अनेक विद्यार्थ्यांनी या बंदीच्या विरोधात न्यायालयात गेल्यानंतर, मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य बंदी कायम ठेवत असे म्हंटले होते की, हिजाब घालणे इस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एकसमान पोशाख नियमांचे पालन केले जावे.