भारत पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काही पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करत होते.. यावेळी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. अखनूरमध्ये लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता.त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली.
ड्रोन, हेलिकॉप्टर आणि स्निफर डॉगच्या मदतीने शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या 38 तासांनंतर मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राजौरीमध्ये लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले होते.आता त्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.दरम्यान, राजौरी आणि पुंछमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
20 डिसेंबरच्या संध्याकाळपासून राजौरीतील थानामंडी परिसरात सुरू असलेली ही कारवाई आज चौथ्या दिवशीही सुरू आहे. काही दिवसापूर्वी लष्कराचे तीन जवान दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते हा हल्ला थानामंडी परिसरात होता तर गेल्या महिन्यात राजौरीच्या कालाकोट येथे सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कॅप्टन आणि जवानही शहीद झाले होते..