संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या तीन सुधारित नव्या फौजदारी न्याय विधेयकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. भारतीय दंड संहिता, गुन्हेगारी प्रक्रिया आणि भारतीय पुरावे कायदा १८७२ यांची जागा आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांनी घेतली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ही तीन सुधारित फौजदारी कायदा विधेयके नुकतीच मंजूर करण्यात आली होती. . राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ डिसेंबर रोजी या विधेयकांना मंजुरी दिली आहे.
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड ही विधेयके अधिवेशनात मंजूर झाल्यावर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितले होते. की, ही तीन इतिहास घडवणारी विधेयके एकमताने मंजूर करण्यात आली आहेत. ज्यामुळे आपल्या गुन्हेगारी न्यायशास्त्राच्या वसाहतवादी बेड्या फेकून दिल्या जातील ज्या नागरिकांसाठी हानीकारक होत्या.